Site icon लोकाशा-बंब न्यूज

विरोधकांचा राजकीय अस्तित्वासाठी तर आमचा शेतकरी हितासाठी लढा-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर, जयदत्त अण्णांचे मार्गदर्शन आणि आमचे प्रयत्न यामुळे विकास कामे मार्गी लागतील- आ लक्ष्मण पवार

बीड/प्रतिनिधी
बाजार समितीच्या निवडणुकीत स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठीच सारे एकत्र आनले आहेत त्यांचा अस्तित्वासाठी तर आमचा शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा आहे त्यामुळे शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले असून बीड आणि गेवराई मतदार संघातील विविध कामे एक वर्षात पूर्ण होतील कारण जयदत्त अण्णांचे मार्गदर्शन आणि आमचे प्रयत्न सातत्याने चालू असल्याचे प्रतिपादन गेवराईचे आ लक्ष्मण पवार यांनी केले आहे

कृषी उत्पन्न बाजार समिती बीड निवडणुक २०२३ च्या शेतकरी विकास पॅनल आयोजित पिंपळनेर, बहिरवाडी सर्कल मधील मतदारांचा मेळावा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व आ.लक्ष्मण पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी डॉ योगेश क्षीरसागर, प्रा जगदीश काळे अमृत सारडा भागवत पौळ,अरुण डाके अजय मोरे बंडू लांडे, अमर नाईकवाडे, गंगाधर घुमरे,कल्याण बप्पा खांडे, गणपत डोईफोडे, बाजीराव बोबडे, आनंदराव लांडे, दादासाहेब गिरी, दिनेश पवार, सुंदर चव्हाण, सतीश पाटील ,सुभाष सपकाळ, मनोज पाटील, जावेद सर अरुण बोंगाणे, बबन गोरे, शिवाजी जाधव, राधेश्याम कासट, हशम पटेल, बाबासाहेब मुंडे, हनुमान जगताप यांच्यासह मार्केट कमिटीच्या निवडणुकीत उभे असलेले उमेदवार सर्कल प्रमुख सरपंच उपसरपंच उपस्थित होते

यावेळी बोलताना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, पिंपळनेर सर्कल मध्ये चित्र वेगळेच दिसू लागले आहे आज सर्वजण एकत्र आले आहे मार्केट कमिटी शेतकऱ्यांच्या हक्काची संस्था आहे ती शेतकऱ्यांचीच राहावी म्हणून सर्वांची इच्छा आहे जे उमेदवार दिले आहेत ते शेतकरी पुत्रच आहेत हे काही परदेशातून आणलेले नाही आपल्याच सर्कलमधील उमेदवार आहेत सदैव सेवेत असणारे हे लोक आपलेच आहेत लोकशाही वाकाव लागत हे धडे घ्यावे लागतात हे शेजारच्या मतदारसंघातून लक्षात घेण्यासारखे आहे मागच्या काळात मराठवाड्याचा निधी वळवण्याचा प्रयोग झाला पण आता परत जनहिताच सरकार आलं आहे आणि तो निधी परत येऊ लागला आहे वाढत्या ओळखीचा असेल तर जे हवे ते मिळत असते त्याप्रमाणे बीड जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील विकास कामांसाठी प्रस्ताव दाखल करून निधी उपलब्ध करून घेत आहोत पाडळसिंगी कुकडगाव पिंपळनेर ते वडवणी हा 180 कोटीचा रस्ता मंजूर झाला असून ताडसोन्ना या ठिकाणी 133 केवीचे सब स्टेशन मंजूर झाले आहे त्याचबरोबर बीड ते पिंपळनेर हा राज्य रस्ता मार्गे लागत असून हा राष्ट्रीय महामार्ग व्हावा यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे तो सुद्धा लवकरच मार्गी लागेल सोलापूर धुळे मार्गावर या भागाकडे येण्यासाठी मागणी केलेली आहे ही सगळी विकासाची प्रक्रिया निरंतरपणे चालू आहे विरोधात सगळे जमा झाले आहेत वेगळी मुखवटे घेऊन समोर आलेली ही मंडळी जरा नीट तपासून पहा अनेकांचे हात काळे झालेले आहेत विरोधक स्वतःच्या राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आलेले आहेत आपण मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा देत आहोत आपण फक्त विकासासाठी कामे करतो हे लोकांच्या लक्षात आलेले आहे ही तर सुरुवात आहे आम्ही बोलतो तेच करतो चाळीस वर्षात कधी कुणाला टक्केवारी मागितली नाही किंवा कोणाला त्रासही झाला नाही राजकीय अरिष्ठाचे संरक्षण करण्यासाठी छत्रीवर मतदान करा व्हाट्सअप वर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करून शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले यावेळी बोलताना गेवराईचे आ लक्ष्मण पवार म्हणाले की, मार्केट कमिटी ही शेतकऱ्यांचा कणा आहे जनमत पाठीशी असणाऱ्यांनी मार्केट कमिटीचा संचालक निवडावा लागतो कारण ही संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी असते चांगल्या नेतृत्वाकडे ही संस्था असावी लागते,म्हणून हे सर्व मतदार शेतकरी विकासच्या सर्व उमेदवारांना निवडून देतील, या संस्थेत राजकारण बाजूला ठेवून कामे करावी लागतात महाविकास आघाडी सरकारने मराठवाड्याच्या विकासाचा निधी पळवला होता मात्र आमच्या सरकारने आता पुन्हा हा निधी वितरित करण्यास सुरुवात केली आहे गावच्या गरजा असणाऱ्या कामांना आता सुरुवात झाली आहे या भागातील विकासासाठी मी आणि जयदत्त आण्णा सदैव पुढे आहोत विकास कामात राजकारण करू नका, लोकसभा आणि विधानसभेपूर्वीच सर्व कामे मार्गी लागतील अण्णांचे मार्गदर्शन आणि आमचे प्रयत्न यामुळे सर्व विकास कामे पूर्ण करून घेऊ, गेवराई तालुक्यात पंडितांचा खूप त्रास होता पण आज त्याच पंडितांना लोकशाही कळू लागले आहे आता लोकांच्या हाता पाया पडू लागले आहेत दारात जाऊ लागले आहेत आज पुण्याला बैठक होती पण अण्णांचा आदेश आला कार्यक्रम महत्त्वाचा आहे म्हणून आज मुद्दाम हजर राहिलो आहे शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असे आव्हान त्यांनी केले यावेळी सूत्रसंचालन गणपत डोईफोडे यांनी केले तर गंगाधर भुमरे सतीश पाटील जगदीश काळे अमर नाईकवाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले

शेतकरी विकास पॅनलच्या सर्व 18 उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून द्यावे असे आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. या मेळाव्यास पिंपळनेर, बहिरवाडी सर्कल मधील सरपंच, ग्रा.पं.सदस्य, हमाल-मापाडी, सेवा सहकारी सोसायटी सदस्य, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version