Site icon लोकाशा-बंब न्यूज

राज्यात दहा दिवस पावसाळ्यासारखा पाउस कोसळणार- पंजाब डख, 24 एप्रील ते 2 मे पर्यंत गारपिठ महाराष्ट्राला झोडपणार

उमापूर / प्रतिनिधी

  पावसाळ्यात पाऊस पाहिला नसेल इतका वारा, गारपीठ सह पाऊस दि.२४ एप्रील ते २ मे पर्यंत भाग बदलत बदलत राज्यभरात होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी वर्तवीले आहे या दरम्याण शेतकऱ्यांनी स्वत: सह पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी असे आवाहण ही डक यांनी केले आहे  तसेच गारपीट कशी होते हे या तारखेत सर्वांना पहायला मीळेल असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील विविध भागात हवामानाचा अंदाज त्यांनी वर्तवीला आहे यामध्ये पुर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी दि 21,22,23, 24,25, 26,28, 29, तुरळक भागात दररोज भाग बदलत पाउस काही ठिकाणी वारा तर कुठे गारपिठ असेल तर उत्तर महाराष्ट्र दि .22,26,27,28,29,30 या तारखेत भाग बदलत तुरळक ठिकाणी कुठे वारे तर काही भगात गारपिठ तर कुठे पाउस पडेल तर मराठवाडा विभागात दि . 25,26,28,29, 30 या तारखेत भाग बदलत काही ठिकाणी गारपिठ ,वारा ,विजा, पाउस असेल. दक्षिण व प. महाराष्टू दि .26,27,28,29,30 दरम्याण काही ठिकाणी गारपिठ वारे विजा पाउस असेल. प-विदर्भ- दि .25,26,26,28,29,30 या तारखेत भाग बदलत काही भागात गारपिठ कुठे वारे कुठे पाउस असेल असा अंदाज पंजाबराव डक यांनी वर्तवीला आहे.

Exit mobile version