Site icon लोकाशा-बंब न्यूज

अजित पवार यांनी ट्विटरवरून हटवलं राष्ट्रवादीचं चिन्हं


मुंबई, 18 एप्रिल : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांनी पक्ष चिन्हाचा फोटो हटवला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रवादीचा लोगो हटवल्याचं समोर आलं आहे. दरम्यान NCP चं नाव कायम ठेवलं आहे.

‘…

मुंबई
राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी फेसबुकवरूनही चिन्हं हटवल्याचं दिसत आहे. फेसबुकवरही फक्त अजित पवार यांचा स्वत:चा फोटो आहे. त्यांच्या प्रोफाइलचा वॉलपेपरही हटवण्यात आल्याचं दिसत आहे. तर राष्ट्रवादी पक्षाचं चिन्हं देखील हटवल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगताना दिसत आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे बंद दाराआड चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचे नेते सर्वकाही सुरळीत आणि चांगलं सुरु असल्याचं सांगत आहेत.

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काय म्हणाले?

मी आणि माझे सहकारी हे सगळे एक विचाराने राष्ट्रवादी कॅाग्रेस अधिक शक्तीशाली कसा करता येईल यासाठी काम करत आहे. दुसरा कुठलाही विचार कुणाच्याही मनात नाही.

याआधी एकनाथ शिंदे यांनी अशाच प्रकारचं बंड केलं होतं. शिवसेनेतून बाहेर पडण्याआधी त्यांनी ट्विटरवरचा लोगो काढला होता. त्यानंतर गुवाहाटी आणि भाजपसोबत शिंदे गटाची युती असा घटनाक्रम संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला होता. त्याची पुनरावृत्ती होणार की काय अशीही एक चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळत आहे.

Exit mobile version