Site icon लोकाशा-बंब न्यूज

मराठवाडा कार्यकारिणीवर जालिंदर धांडे, शुभम खाडे, आनंद डोंगरे, मराठवाड्यातील ८ जिल्हे, ४८ तालुक्यांत ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे २६०० सदस्य ठरले

औरंगाबाद (प्रतिनिधी) : पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या संघटनेची मराठवाडा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर लोंढे हिंगोली, जालिंदर धांडे बीड यांची, तर सरचिटणीस पदी शेखलाल शेख छत्रपती संभाजीनगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठवाड्यातील ८ जिल्हे व ४८ तालुक्यात २६ हजार ५०० पेक्षा जास्त पत्रकार सदस्यांनी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ संघटनेशी आपले नाते जोडले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सभासद संख्या असणारी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ ही मराठवाड्यातील एकमेव संघटना झाली आहे. मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया यांनी मराठवाडा कार्यकारिणीची घोषणा केली.
‘व्हॉइस ऑफ मीडिया’ पत्रकार व पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी लढा देणारी संघटना आज देशपातळीवर २८ राज्यांमध्ये २६ हजार सभासद संख्या घेऊन अवघ्या दोन वर्षांत ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ने देशात नंबर एकची पत्रकार संघटना म्हणून स्थान मिळवले आहे. संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष संदीप काळे यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या संघटनेत पत्रकारांच्या हितासाठी असणारी पंचसूत्री हेच संघटनेचे एकमेव ब्रीद आहे. संघटनात्मक बांधणी हे पर्व आता संपले आहे, आता कृतिशील कार्यक्रम सुरू झाला आहे.
पत्रकारांना घरे मिळाली पाहिजेत. पत्रकारांना आरोग्य कार्ड मिळाले पाहिजेत. पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण मोफत झाले पाहिजे. पत्रकारांना सेवानिवृत्तीनंतर सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे. पत्रकारांना अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती मिळाली पाहिजे. अर्धवेळ काम करणाऱ्या पत्रकारांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे. या स्वरूपाचे पंचसूत्र घेऊन ही संघटना काम करत आहे. मराठवाड्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यकारिणी, महानगर कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी असे प्रत्येक जिल्ह्यात २५० पत्रकारांची गुंफण या संघटनेच्या माध्यमातून झाली आहे. विशेष म्हणजे साप्ताहिक, इलेक्ट्रॉनिक, महिला अशा वेगवेगळ्या १२ विंग या संघटनेच्या आहेत. संपूर्ण मराठवाड्यात २६०० पेक्षा जास्त पत्रकारांचे संघटन मजबूत करणारी ही एकमेव संघटना झाली आहे. जिल्हा, महानगर व तालुका कार्यकारिणीचे काम पूर्ण झाले आहे. मराठवाडा विभागाची कार्यकारिणी मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया यांनी खालीलप्रमाणे घोषित केली. मराठवाडा विभागीय कार्यकारिणी ज्ञानेश्वर लोंढे हिंगोली कार्याध्यक्ष, जालिंदर धांडे बीड कार्याध्यक्ष, विशाल माने परभणी उपाध्यक्ष, बालाजी एबीतदार नांदेड उपाध्यक्ष, अमर चोंदे धाराशिव-उपाध्यक्ष, राजेंद्र कचरू भालेराव जालना उपाध्यक्ष, शुभम खाडे बीड उपाध्यक्ष, नामदेव दळवी हिंगोली उपाध्यक्ष, शेखलाल शब्बीर शेख औरंगाबाद सरचिटणीस तथा मराठवाडा मुख्यसंयोजक, संगम कोटलवार लातूर सहसरचिटणीस, अप्पासाहेब शिंदे धाराशिव सहसरचिटणीस, दत्तात्रेय अहिरे धाराशिव सह-कोषाध्यक्ष, शिवाजी राजे पाटील नांदेड संघटक, किशोर महाजन औरंगाबाद संघटक, सचिन चांडक लातूर संघटक, आनंद डोगरे बीड संघटक, कृष्णा जोमेगावकर नांदेड कार्यवाहक, बाळासाहेब जाधव लातूर कार्यवाहक, अरुण चव्हाण हिंगोली कार्यकारिणी सदस्य, विष्णू निवृत्ती कदम जालना कार्यकारिणी सदस्य यांचा समावेश आहे. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष ग्रामीण अनिल मस्के, राज्याध्यक्ष राजा माने, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया यांनी अभिनंदन केले आहे. येत्या ३० एप्रिलला बीड येथे मराठवाडा अधिवेशन होत आहे. त्या अधिवेशनात या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान होणार आहे.

Exit mobile version