Site icon लोकाशा-बंब न्यूज

परळीत बँक अधिकाऱ्यांना हाताशी धरून १० लाखांचे बोगस कर्ज उचलले ;श्री छत्रपती राजश्री शाहू अर्बन सहकारी बँकेच्या तत्कालीन शाखाधिकार्‍यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; गुन्हा दाखल झाल्याने परळीत उडाली खळबळ


परळी वैजनाथ दि १४ (लोकाशा न्युज) :-
शहरातील कंडक्टर कॉलनी येथील रहिवासी दादाराव संभाजी मुंडे व त्यांचा मुलगा डॉ.मनोज मुंडे यांच्या नावावर परस्परच श्री छत्रपती राजश्री शाहू अर्बन सहकारी बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने १० लाख रुपयांचे कर्ज उचलल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून ह्या प्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,परळी शहरातील कंडाक्टर कॉलनी भागातील रहिवासी दादाराव संभाजीराव मुंडे यांना त्यांच्याच नात्यातील शिवाजीराव गित्ते,गोविंद गित्ते यांनी वाहन खरेदी करावयाचे असुन तुमची जामीनदार म्हणुन सही हवी असल्याचे सांगुन वरील दोघे व छत्रपती राजर्षी शाहु बॅंकेचे परळी शाखाधिकारी भागवत कंठाळे यांनी कोर्या कागदावर सह्या घेवुन दि. २५ मार्च २०१६ ते ४ एप्रिल २०१६ दरम्यान संगनमत करुन परस्पर वाहन कर्ज उचलले ही बाब दादाराव मुंडे यांना २४ एप्रिल २०१७ रोजी बॅंकेची नोटीस मिळाल्यानंतर लक्षात आली. यानंतर त्यांनी चौकशी केली असता आम्ही ते कर्ज भरु तुम्हाला कसलाही त्रास होणार नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर १९ नोव्हेंबर रोजी चौकशी केली असता दादाराव मुंडे व डॉ.मनोज मुंडे जामीनदार असलेली शिवाजीराव गित्ते यांची वाहन कर्ज उचल करुन १० लाख रुपये वाहन कर्ज केले या कर्ज प्रकरणात शिवाजी गित्ते व डॉ.अंकुश जब्दे यांच्या जामीनदार म्हणुन स्वाक्षर्या आहेत. हे सर्व कर्ज वरील बँकेचे शाखाधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संगनमत करुन परस्पर उचलले. याबाबत दादाराव मुंडे यांनी बॅंकेतुन माहिती मिळविल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. यानंतरही आम्ही ते कर्ज भरुत तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही असे सांगीतले. संबंधीत व्यक्ती नात्यातील असल्याने वाट बघितली परंतु बॅंकेच्या नोटीस येत असल्याने दादाराव मुंडे यांनी सरळ शहर पोलीस स्टेशन गाठले आणि झाला सारा प्रकार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांना सांगितला. सदर प्रकरणाचा गांभीर्याने अभ्यास करून आणि दादाराव मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी शिवाजीराव गित्ते, गोविंद गित्ते, अंकुश जब्दे, श्री छत्रपती राजश्री शाहू अर्बन सहकारी बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक भागवत कंठाळे, छत्रपती राजर्षी शाहु बॅंकेचे लिपिक, हिशोबनीस या सहा जणांविरुध्द परळी शहर पोलिस ठाण्यात कलम ४२०, ४०९, ४६४, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्वतः पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे हे करीत आहेत.

Exit mobile version