Site icon लोकाशा-बंब न्यूज

रशियाची कोरोना लस तयार; या दिवशीपासून होणार वितरण

रशिया : जगातील सर्व देश मागे टाकत रशियाने कोरोनाव्हायरसची लस बनवण्यात बाजी मारली आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी घोषणा केली.  ‘आम्ही कोरोनाची सुरक्षित लस बनविली आहे आणि देशात त्यांची नोंद देखील झाली आहे. ‘मी माझ्या दोन मुलींपैकी एकाला प्रथम लस दिली आहे आणि तिला बरे वाटले आहे.’ असे ते म्हणाले.  दरम्यान, जगातील ही पहिली लस संरक्षण मंत्रालय आणि गमलय नॅशनल सेंटर फॉर रिसर्च ऑन एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी यांनी तयार केली आहे. सप्टेंबरमध्ये याचे उत्पादन करण्याची आणि ऑक्टोबरपासून लोकांना देण्याची तयारी सुरू झाली आहे.
रशियन अधिकाऱ्यांनुसार, Gam-Covid-Vac नावाच्या या लसीला निश्चित योजनेनुसार रशियन आरोग्य आणि नियामक मंडळाने मान्यता दिली आहे. ही लस वैद्यकीय कर्मचारी, शिक्षक आणि जोखीम असलेल्या लोकांना दिली जाईल असे सांगितले जात आहे.

फॉर्म्युला चोरण्याचा आरोप

एका महिन्यापूर्वी, रशियाने संकेत दिले होते की त्यांची लस चाचणीत आघाडीवर आहे आणि ते याची 10 आणि 12 ऑगस्ट दरम्यान नोंदणी करतील. दरम्यान या लसीबाबत अमेरिका आणि ब्रिटनला रशियावर विश्वास नाही. रशियावर वॅक्सिनचा फॉर्म्युला चोरण्याचा आरोपही लावण्यात येत आहे.

Exit mobile version