बीड प्रतिनिधी- साधारण डिसेंबर 2019 मध्ये बीड नगरपरिषद अंतर्गत शहरातील विविधता कामांमधील भ्रष्टाचार व अनियमितते बाबत विभागीय आयुक्त श्री सुनील केंद्रेकर यांच्याकडे तक्रारीसह मा. उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील करण्यात आली होती. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी सदरील प्रकरणात सखोल चौकशीसाठी द्विसदस्यीय समिती स्थापन केली होती. चौकशी अंतिम समितीने चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयात सादर केला असता त्यात तत्कालीन बीड नगर परिषदेचे कनिष्ठ अभियंता किरण कुमार देशमुख हे दोषी आढळले. त्यानंतर अद्याप पर्यंत सदरील अहवालातील दोषींवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नसताना श्री किरण कुमार देशमुख यांना दि. 9 डिसेंबर 2022 रोजी पुन्हा बीड नगर परिषदेचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. या विरोधात बीड पालिकेचे गटनेते फारुख पटेल यांनी दि. 21 मार्च 2022 मा. जिल्हाधिकारी मुधोळ मॅडम यांना व मा. विभागीय आयुक्त श्री सुनील केंद्रेकर यांना दि. 23 मार्च 2022 रोजी तक्रार अर्ज दिला होता. त्याच अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी, बीड यांनी किरण देशमुख यांच्याकडील बीड नगर परिषदेचा अतिरिक्त पदभार रद्द केला असल्याचे आदेश दि. 12 एप्रिल 2023 रोजी पारित केले असल्याचे गटनेते फारूक पटेल यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
यासोबतच डिसेंबर 2019 मधील चौकशी अहवालावर तात्काळ कार्यवाही करावी व शासकीय सेवेत असताना श्री किरणकुमार देशमुख यांनी कोट्यावधींची कामे (ठेकेदारीचा व्यवसाय) केली. याचे पुरावे देखील माननीय विभागीय आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत दिलेले आहेत याची देखील स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील फारूक पटेल यांनी केली असल्याचे कळवले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा दणका,भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरलेल्या किरण देशमुख यांच्याकडील बीड नगर परिषदेचा अतिरिक्त पदभार रद्द
