Site icon लोकाशा-बंब न्यूज

लवकरच परळीकरांच वैद्यनाथ तिर्थक्षेत्राच्या विकासाचे स्वप्न पूर्ण होणार, खा. प्रीतमताई केंद्रीय पर्यटन मंत्री किशन रेड्डी यांना भेटल्या, केंद्र सरकारच्या ‘प्रसाद योजनेत’ ही वैद्यनाथ मंदिराचा समावेश करण्याची केली मागणी, खा. मुंडेंच्या मागणीची दखल घेऊन रेड्डीनी वैद्यनाथ मंदिर सुधारित विकास आराखडा मागवून घेतला

बीड, दि. 5
बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी केंद्रीय पर्यटन मंत्री श्री किशन रेड्डी जी यांची नुकतीच दिल्ली इथे भेट घेतली. आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जवाबदारी सांभाळताना मा. Pankaja Gopinath Munde ताईंनी “वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विकास आराखडा” मंजूर केला होता, एकशे तेहतीस कोटी रुपयांच्या या विकास आराखड्यातुन तेंव्हा वीस कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करण्यात आला होता, यासंदर्भात आज खा. मुंडेंनी मा. मंत्री महोदयांशी चर्चा केली.

प्रभू वैद्यनाथ मंदिराचा विकास व्हावा याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करत असताना केंद्र सरकारच्या ‘प्रसाद योजनेत’ देखील आपल्या वैद्यनाथ मंदिराचा समावेश व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्या अनुषंगाने पर्यटन मंत्री किशन रेड्डी जी यांची भेट घेतली. दरम्यान राज्य सरकारकडून वैद्यनाथ मंदिर सुधारित विकास आराखडा मागवून घ्या आणि आपल्याला सादर करा अशा सूचना मा. मंत्री महोदयांनी संबंधिताना दिल्या.

त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन पाहता लवकरच परळीकरांच तिर्थक्षेत्राच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यास यश येईल हा विश्वास दुणावला असल्याचे खा. प्रीतमताईंनी म्हटले आहे.

Exit mobile version