बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज) : केंद्र सरकार भ्रष्टाचार करणार्यांना आधार तर देशाचे रक्षण करणार्या सैनिकांना मात्र आधार देत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. कारण सरकार सैनिकांच्या मागण्या मान्य करण्यास तयार नसल्याचे समोर येत आहे. वेगवेगळ्या मागण्यांसाठी मागच्या 45 दिवसांपासून माजी सैनिकांचे दिल्लीतील जंतर मंतरवर धरणे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाची सरकारने अजून दखल घेतलेली नाही, त्यामुळेच बीडमधील माजी सैनिकांच्या संघटनेत सरकारविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळेच सरकारच्या विरोधात बीडमधील तब्बल 4200 माजी सैनिक रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देवून सरकारने जर सैनिकांच्या मागण्या पुर्ण केल्या नाहीत तर आम्ही सर्वजण मिळून संसदेला घेराव घालू असा ईशारा माजी सैनिक संघटनेच्या विद्या सानप, खोटे, बळीराम राख यांच्यासह सर्व तालुका संघटनेने सरकारला दिला आहे. त्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांना लेखी निवेदन दिले आहे.
बीडमधील 4200 माजी सैनिक केंद्र सरकारच्या विरोधात उतरले रस्त्यावर, दिल्लीतील धरणे आंदोलनाला 45 दिवस होवूनही केंद्र सरकार सैनिकांच्या मागण्या पुर्ण करेना, बीडच्या संघटनेने धरणे आंदोलनाला दिला जाहिर पाठिंबा,तात्काळ मागण्या पुर्ण केल्या नाहीत तर पुर्ण संसदेला घेराव घालणार – विद्या सानप, कलेक्टरांमार्फत सरकारला पाठविले पत्र
