Site icon लोकाशा-बंब न्यूज

एपीआय विलास हजारेंनी नसेच्या औषध-गोळ्या विक्री करणारा आणखी एक आरोपी पकडला, नसेच्या गोळ्याचे 120 पाकीट जप्त

बीड,
दैनिक लोकाशा आणि दिव्य वार्ता या दैनिकांनी सदरील समस्या समोर आणून मुस्लीम समाजातील बहुतांशी युवकांना नशेच्या चक्रात ओढले गेले . यातून गुन्हेगारी आणि कौटुंबिक विसवांद वाढला होता . शेवटी बीडच्या पोलिसांनी सदरील व्यसनात अघोरी बाटली पुरवणारे दलाल मंगळवारी रात्री जेरबंद केले आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली . रमजान महिन्यात महिनाभर सैतान कैद असतो असे म्हणतात , अगदी तसेच मुलांना व्यसनात ढकलनारे सैतान जेरबंद केल्याने खाकीचे कौतुक होत आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी ही पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख एपीआय विलास हजारे यांनी आणखी एका आरोपीला बीडच्या बसस्थानक परिसरातून गजाआड केले आहे, पकडण्यात आलेला टाक हा नसेच्या गोळ्या विक्री करताना मिळून आला आहे, यावेळी हजारेंनी नसेच्या गोळ्याचे 120 पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. हजारेंनी केलेल्या या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
खोकल्याचे औषध पिवून नशा करणे नवीन नाही , १२० ची बॉटल ४०० रुपयांना विकत मोठे राकेट होते , यात मोसिन खान हिमायत अली खान , फैजान शेख शेख मसूद यांना एपीआय हजारे यांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतले होते, याप्रकरणी पेठ बीड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यावेळी काही औषद साठा पण जप्त करण्यात आला आहे, तर बुधवारी सकाळी एपिआय विलास हजारे यांनी टाक नावाच्या आणखी एका आरोपीला नासेच्या गोळ्या विक्री करताना पकडले आहे, ही कारवाई बीड बसस्थानक परिसरात करण्यात आली आहे, यावेळी सदर आरोपीकडून नसेच्या गोळ्याचे 120 पाकिटे जप्त करण्यात आली आहेत, हजारेंच्या या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

………………
एपीआय हजारे शंभर टक्के पास
एस पी नंदकुमार ठाकूर यांच्या पथकांचे प्रमुख एपी आय विलास हजारे यांनी धाडसी कार्यवाही करत शहरात खाकीची जरब वाढवली आहे . शहरात अश्या नसेत मुलाकडून गुन्हे होतात , सामाजिक शांतता भंग पावते यामुळे ही कार्यवाही अभिनंदीय आहे असे लोकातून बोलले जाते आहे .

Exit mobile version