Site icon लोकाशा-बंब न्यूज

वर्षभरात उभा राहणार जिल्हाधिकाऱ्यांचे नवे निवासस्थान, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी केले भूमिपूजन

बीड- बीडच्या जिल्हाधिकारी यांचे शासकीय निवासस्थान नव्याने बांधण्यात येणार आहे.यासाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते गुढीपाडवा निमित्ताने भूमिपूजन करण्यात आले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी यांच्या नवीन निवासस्थानाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता.त्याला मंजुरी मिळाली असून दोन कोटी 56 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.दोन मजली निवासस्थान बांधण्यात येणार आहे.सिताई कन्स्ट्रक्शन कडून हे काम केले जाणार आहे.

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते गुढीपाडवा निमित्ताने नव्या घराचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग बीड चे उपअभियंता चंद्रकांत बोराडे यांची उपस्थिती होती.160 स्क्वेअर मीटर चा तळमजला आणि 135 स्क्वेअर मीटर चा पहिला मजला असे बांधकाम होणार असून पुढील वर्षापर्यंत नवे निवासस्थान तयार होईल .

साधारपणे पंधरा वर्षांपूर्वी या बांधकामाला मंजुरी मिळाली होती,मात्र त्यावेळी धानोरा रोड भागात असलेल्या चांदमारी परिसरात हे निवासस्थान बांधण्यास मंजुरी होती,नंतर हा प्रस्ताव बारगळला.त्यानंतर नव्याने पुन्हा प्रस्ताव पाठविण्यात आला.त्याला यावर्षीच्या अर्थसंकल्प मध्ये मंजुरी मिळाल्याने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी भूमिपूजन करून घेतले.

पन्नास ते पंचावन्न वर्षांपूर्वी किंवा त्याहीपेक्षा जास्त अगोदर म्हणजेच निजामकाळात जुने निवासस्थान बांधण्यात आले होते.मात्र त्याचे आयुर्मान संपल्यामुळे नव्या निवासस्थानाला मंजुरी मिळाली.

Exit mobile version