Site icon लोकाशा-बंब न्यूज

मुळे आबांना एलसीबीचा दणका, गोदामावर छापेमारी करत पोलिस निरीक्षक सतिश वाघ यांनी 50 लाखाचा गुटखा पकडला, मुळेना केली अटक

बीड : जिल्हयात मागच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी गुटखा पकडण्यात आल्यानंतर मंगळवारी पहाटेच स्थानिक गुन्हे शाखेने बीड जिल्ह्यात गुटख्याची मोठी कारवाई केली आहे. यात यापूर्वी अनेक प्रकरणात रेकॉर्डवर असलेला आणि यापूर्वी एकदा अटक झालेल्या गुटखा माफीया मुळे आबा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. एलसीबीने त्याच्या गोदामावर छापा मारला असून जवळपास 50 लाखाचा गुटखा जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणात आता पिंपळनेर पोलीसात गुन्हा दाखल केला जाणार आहे. एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश वाघ आणि त्यांच्या टीमने केलेल्या या कारवाईने गुटखा व्यावसायीकांसोबतच त्यांच्या पाठीराख्यांमध्येही खळबळ माजली आहे.

Exit mobile version