Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताई मुंडे यांनी परळीच्या मुख्याधिकाऱ्यांना घेतले फैलावर, अमर मैदानाची झाली कचराकुंडी ; रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

परळी वैजनाथ ।दिनांक २०।
शहरातील अमर मैदानाची नगरपरिषदेने अक्षरशः कचराकुंडी केल्याने येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आज या भागातील महिलांच्या शिष्टमंडळाने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन त्यांचेपुढे गाऱ्हाणे मांडले. पंकजाताईंनी लगेचच मुख्याधिकाऱ्यांना फोन करून त्यांना फैलावर घेत चांगलीच कानउघाडणी केली.

झाले असे, पंचवटीनगर परिसरात असलेले अमर मैदान हे पूर्वी खेळाचे मैदान होते पण सध्या ते पालिकेचे डम्पिंग ग्राऊंड बनले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातील सर्व कचरा गोळा करून नगरपरिषद त्या ठिकाणी आणून टाकते, ज्यामुळे कचऱ्याचे मोठ मोठे ढीग मैदानात तयार झाले आहेत. परिसरातील नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले असून त्यांना जीवघेण्या आजारांशी सामना करावा लागत आहे. हा कचरा उचलावा अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली परंतु पालिका प्रशासानाने याकडे साफ दुर्लक्ष केले.

पंकजाताईंनी घेतले सीईओला फैलावर

यासंदर्भात पंचवटीनगर परिसरातील महिलांच्या शिष्टमंडळाने आज पंकजाताई मुंडे यांना भेटून हा सर्व प्रकार कानावर घातला आणि न्याय देण्याची मागणी केली. पंकजाताईंनी लगेचच मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांना फोन करून चांगलेच खडसावले. मैदानातील या कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावा आणि रहिवाशांना मोकळा श्वास घेऊ द्या अशी त्या म्हणाल्या. तातडीने कचरा उचलण्याची कार्यवाही करू असे मुख्याधिका-यांनी यावेळी सांगितले.
••••

Exit mobile version