Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते ११ कोटी रूपयांच्या जलजीवन मिशन कामांचे उद्या भूमिपूजन, हिवरा, गोवर्धन, मलनाथपूर, रामेवाडी सह सात गावांमध्ये होणार कामांना सुरवात

परळी वैजनाथ ।दिनांक १८।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते उद्या रविवार व सोमवार या दोन दिवसांत सुमारे अकरा कोटी रूपयांच्या जलजीवन मिशन कामांचे भूमिपूजन होत आहे. तालुक्यातील हिवरा, गोवर्धन, मलनाथपूर, रामेवाडी सह सात गावांमध्ये त्या पाणी पुरवठा कामांना सुरवात करणार आहेत.

केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्हयात जलजीवन मिशन योजना कार्यान्वित झाली आहे. पंकजाताई मुंडे आणि खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी त्यासाठी प्रयत्न करून या योजनेत परळी तालुक्यासह जिल्हयातील सर्वच गावांचा यात समावेश केला आहे. या मिशन अंतर्गत पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते ता. १९ व २० मार्च रोजी मागील आठवडय़ानंतर पुन्हा एकदा मतदारसंघातील विविध गावांमध्ये पाणी पुरवठा योजनेच्या कामांना सुरवात होणार आहे.

उद्या रविवारी सायंकाळी ५ वा. मलनाथपूर (५७ लाख रू.), सायंकाळी ६ वा. रामेवाडी-कासारवाडी (१ कोटी), संध्याकाळी ७ वा.हिवरा (३ कोटी ६७ लाख) आणि रात्रौ ८ वा. गोवर्धन (१ कोटी ६३ लाख) येथे तर २० मार्च रोजी सायंकाळी ६ वा. सेलू परळी (१ कोटी), संध्याकाळी ७ वा. नंदनज (५४ लाख) आणि रात्रौ ८ वा. सारडगाव (२ कोटी ३२ लाख) येथे जलजीवन मिशन अंतर्गत कामाचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमास ग्रामस्थांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.
••••

Exit mobile version