Site icon लोकाशा-बंब न्यूज

ग्रामपंचायतीवर प्रशासन नेमणूक; शुक्रवारी होणार पुढील सुनावणी

बीड, दि.11 (लोकाशा न्युज) ः सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रने राज्यातील ग्रामपंचायतवर खाजगी प्रशासक निवडणुकीबाबत विरोध दर्शवित न्यायालयात दाद मागितली होती. मंगळवारी दि.11 ऑगस्ट रोजी त्यावर मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठात सुनावणी होऊन यासंदर्भात न्यायालयाने सरपंच परिषदेचे बाजू व अन्य याचिकाकर्त्याची बाजू ऐकून घेऊन शुक्रवारपर्यंत ही सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे सरकारला आता शुक्रवारपर्यंत याबाबत प्रशासक निवड थांबवावी लागणार आहे. येत्या शुक्रवारी म्हणजेच दि. 14 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे. सरपंच परिषदेच्या वतीने सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे आणि प्रदेश सरचिटणीस विकास जाधव यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज्यातील परिषद मुंबई महाराष्ट्राचे सर्व विश्वस्त यांनी न्यायालयात आपली बाजू भक्कम मांडण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. त्यामुळे आता शुक्रवारपर्यंत ग्रामपंचायतीवर कोण पर्सगासक येतो याबाबत सस्पेन्स कायम राहणार आहे. सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे हे आज या सुनावणी बाबत अ‍ॅड. नितीन गवारे यांच्यासोबत होते.

Exit mobile version