बीड दि.9 ः दाखल गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी व तपासात मदत करण्यासाठी पोलीस कर्मचार्याने तीन लाख रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीच्या टिमने गेवराईतील लाचखोर पोलीस कर्मचार्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
जामीनाच्या मदतीसाठी पोलीस
कर्मचार्याने मागितले तीन लाख!
एसीबीच्या कारवाईने बीड पोलीसात खळबळ
