Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड बंदच्या पार्श्‍वभुमीवर बीड शहरात तोबा गर्दी

जीवनावश्यक वस्तुसह इतर खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर

बीड, दि.11 (लोकाशा न्युज) ः जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दि.12 ऑगस्टपासून बीडसह सहा शहरे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार बीड शहर उद्यापासून बंद असल्याने नागरिकांनी आज बाजारपेठेत तोबा गर्दी केली आहे.
भाजी मंडई रोड, सुभाष रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर नाका यासह शहरात इतर ठिकाणी खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. शिवाय शासकीय कार्यालयासमोर देखील आपले कामे उरकून घेण्यासाठी नागरिकांची गर्दी आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व गरजा भागविण्यासाठी नागरिक आजपासून तयारी करून ठेवत आहेत. एकंदरित बीड बंदच्या पार्श्‍वभुमीवर आज शहरात ठिक-ठिकाणी तोबा गर्दी दिसून येत आहे.

Exit mobile version