भोपाळ ।दिनांक २६।
मध्यप्रदेशात आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरविण्यासाठी प्रदेश भाजपाच्या वतीने भोपाळमध्ये दोन दिवसीय बैठक सध्या पार पडत आहे. भाजपच्या सह प्रभारी तथा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे बैठकीस उपस्थित राहण्यासाठी कालपासून भोपाळमध्ये आहेत.
भोपाळ येथील प्रदेश कार्यालयात रविवारी भाजपची बैठक संपन्न झाली. बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. बैठकीस उपस्थित राहण्यासाठी पंकजाताई मुंडे काल सकाळीच भोपाळमध्ये दाखल झाल्या. राजा भोज विमानतळावर प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती सिमा सिंह व कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. दुपारी बैठकीला दीप प्रज्वलनाने सुरवात झाली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ सशक्तीकरण अंतर्गत, बूथ विस्तारक अभियान-2 चा आढावा बैठकीत घेण्यात आला. राज्यात ज्या १०३ जागांवर पराभव झाला होता, त्या आकांक्षी प्रभारी समवेत बैठकीत चर्चा झाली. आगामी निवडणुकीत दोनशे पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी सर्वांनी आतापासूनच कामाला लागावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले. पक्षाच्या संघटनात्मक बाबींवरही यावेळी चर्चा झाली.
बैठकीस प्रभारी पी मुरलीधर राव, सह प्रभारी पंकजाताई मुंडे, प्रदेशाध्यक्ष विष्णूदत्त शर्मा, खा. डाॅ. राम शंकर, संघटन सरचिटणीस हितानंद शर्मा आदींसह वरिष्ठ नेते उपस्थित होते.
••••
