Site icon लोकाशा-बंब न्यूज

खा.प्रितमताई मुंडे यांच्या निधीतून बांधलेल्या सभागृहाचे लोकार्पण उत्साहात संपन्न, भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठानच्या संकुलात उभारले भव्य आणि सुसज्ज सभागृह

बीड । दि. २३ ।
बीड शहरातील संत भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठान येथे खा. प्रितमताई मुंडे यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर करण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा काल उत्साहात पार पडला. समाजाला वैचारिक आयाम देणाऱ्या अध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक सोहळ्यांसाठी माझ्या स्थानिक विकास निधीतून सभागृह देण्याची संधी मिळाली याचा मला मनोमन आनंद झाला आहे यावेळी खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या.

संत भगवान बाबा सामाजिक प्रतिष्ठानच्या संकुलात भव्य आणि सुसज्ज असे सामाजिक सभागृह असावे या लोकभावनेचा आदर करत खा.प्रितमताई मुंडे यांनी सामाजिक सभागृहाच्या निर्माणासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी दिला होता, त्यांनी दिलेल्या निधीतून उभारलेल्या भव्य सभागृहाचे काल उत्साहात लोकार्पण संपन्न झाले. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सर्जेराव तांदळे, देविदास नागरगोजे, नवनाथ शिराळे, स्वप्नील गलधर,चंद्रकांत फड, जगदीश गुरखुदे, विक्रांत हजारी, संतोष राख, संग्राम बांगर यांच्यासह प्रतिष्ठानचे सुभाष धस, प्रा. आर. टी. गर्जे, डॉ. कोकणे, प्रा. दत्ता आघाव यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या कि बीड शहराच्या वैभवात भर टाकणारी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देणारी वास्तू या सभागृहाच्या माध्यमातून उभारली गेली आहे. बीड शहरात होणाऱ्या सांस्कृतिक, सामाजिक आणि अध्यात्मिक सोहळ्यांमध्ये ही वास्तू वापरली जाणार असल्यामुळे माझ्या निधीचा योग्य विनियोग झाला आहे, आणि हीच बाब माझ्यासाठी समाधानकारक आहे. समाजोपयोगी कार्यांसाठी व सर्वसामान्यांना सेवा देणाऱ्या भौतिक सुविधांच्या निर्मानासाठी निधीची कधीही अडचण येऊ देणार नाही, तुमच्या मागणीनुसार विकास कामे करत राहू अशी ग्वाही यावेळी खा.प्रितमताई मुंडे यांनी उपस्थितांना दिली.

••••

Exit mobile version