Site icon लोकाशा-बंब न्यूज

एएसपी पंकज कुमावतांच्या पथकाची अवैध दारू विक्री व गुटख्यावर धडाकेबाज कारवाई ; परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे झाली कारवाई, ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल


परळी वैजनाथ दि १९ (लोकाशा न्युज) :- शिवजयंतीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात दारू विक्री बंदी व कायमची गुटखा विक्री बंदी असा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असतानाही अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या दोघा बियर बार व एका गुटखा विक्री केंद्रावर सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करीत जवळपास पाच लाखांचा ऐवज जप्त केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज दिनांक १९/०२/२०२३ रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की, आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जिल्हाधिकारी बीड यांचे दारूबंदी आदेश लागू असतानाही परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील स्वप्निल बियर बार व पवन बियर बार हे उघडे ठेवून अवैध दारू विक्री करीत आहेत व तसेच त्याचेच बाजूला एक गोविंद केंद्रे इसम गुटखा विक्री करीत आहे माहिती मिळाल्यावर सदरची माहिती त्यांचे पथकातील अंमलदार व पोलीस ठाणे अंबाजोगाई ग्रामीण पीएसआय विठ्ठल केंद्रे यांना देऊन सदर ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने पीएसआय विठ्ठल केंद्रे व केज एचडीपीओ कार्यालयातील अमलदार व एस डीपीओ कार्यालय अंबाजोगाई येथील अमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन स्वप्निल बिअर बार व पवन बियर बार ठिकाणी छापे मारून स्वप्नील बियर बार मधील मॅनेजर इसम नामे रमेश बाबुराव मस्केरा ऊजणी यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून ३,४०,५३५/- रुपयाचा माल ताब्यात घेतला तसेच पवन बार येथील मॅनेजर नामे महादेव बलभीम तारसे रा. धर्मापुरी यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातून १३,०९५/- रुपयांचा माल ताब्यात घेतला तसेच हॉटेल गोविंदाचे बाजूला किराणा किराणा दुकानदार गोविंद ज्ञानोबा केंद्रे याचे ताब्यातून गोवा गुटख्याचा माल व नगदी असे एकूण ५४,०५४/- रुपयाचा माल जप्त दारूबंदीच्या दोन व गुटख्याची एक अशा अशा फिर्याद वरून पोलीस ठाणे परळी ग्रामीण येथे गुन्हे नोंद झाले आहेत. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर बीड, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे फौजदार बालासाहेब फड, बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, मुकेश खरटमोल, अशोक खेलबुडे, सतीश कांगणे यांनी केली आहे.

Exit mobile version