Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्हाधिकाऱ्यांची बदली, आता दीपा मुधोळ बीडच्या नविन जिल्हाधिकारी

बीड: बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची अखेर बदली करण्यात आली असून बीडला जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या बदलीच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. आता अखेर त्यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर दीपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती बुधवारी करण्यात आली आहे. दीपा मुधोळ मुंडे या २०११ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे.

Exit mobile version