बीड, दि. 12 (लोकाशा न्यूज) : 5 फेब्रुवारी रोजी शहरातील लक्ष्मी चौकात झालेल्या टॅम्पो आणि ट्रकच्या धडकेत येथील व्यापारी मोतीलाल चंदुलाल आब्बड (रा.महावीर चौक) यांच्यासह त्यांचा चालक जखमी झाला होता. त्यांच्यावर बीडमधील लोटस् हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते, याठिकाणी उपचार सुरू असताना दि. 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता मोतीलाल आब्बड यांची प्राणज्योत मालवली. मृत्यू समयी त्यांचे वय 60 वर्षे होते, उद्या दि. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 च्या सुमारास त्यांचे पार्थिव शनिवार पेठ, महावीर चौक येथून अमरधाम स्मशानभुमित आणून त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी छायाबाई, आनंद, दिपक ही दोन मुले, भाऊ हिरालाल आब्बड, दोन सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. अब्बड कुटूंबियांच्या दु:खात दै. लोकाशा परिवार सहभागी आहे.
ज्येष्ठ व्यापारी मोतीलाल आब्बड यांचे निधन
