Site icon लोकाशा-बंब न्यूज

खा.प्रितमताई केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांना भेटल्या, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, पीटी उषा यांचीही भेट ; ड्रॅगन बोट खेळाडूंची मागणी केली सादर

दिल्ली । दि. ०२ ।
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची खा. डॉ.प्रितमताई मुंडे यांनी संसदेत सदिच्छा भेट घेतली.यावेळी त्यांनी खा.प्रितमताई मुंडे यांना भरभरून आशीर्वाद दिले आणि लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या आठवणींना उजाळा ही दिला.राजनाथ सिंह यांच्या भेटीने आपल्याला नवी ऊर्जा आणि चैतन्य मिळाले असल्याची भावना खा.मुंडे यांनी व्यक्त केली.

तसेच केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि भारतीय ऑलम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी.टी उषा यांचीही त्यांनी भेट घेतली. देशातील ड्रॅगन बोट खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शनाची संधी मिळावी याकरिता ड्रॅगन बोट खेळाला भारतीय ऑलम्पिक असोसिएशनने मान्यता द्यावी अशी मागणी खा.प्रितमताई मुंडे यांनी त्यांच्याकडे केली.

••••

Exit mobile version