बीड (प्रतिनिधी):- शहरातील सिटी पोलीस ठाणे ते जिजामाता चौक या मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे मुख्य बाजारपेठ असलेल्या परिसरात ग्राहकांना तसेच व्यापाऱ्यांना या कामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. सुभाष रोड ज्या पद्धतीने दर्जेदार झाला आहे त्याच प्रमाणे हा देखील रस्ता व्हावा अशी मागणी येथील व्यापारी बांधवांनी केली. याभागातील व्यापारी बांधवांशी प्रत्यक्ष भेट घेऊन होणाऱ्या अडचणी बद्दल आ.संदीप क्षीरसागर यांनी चर्चा केली.
नगरपरिषद बीडच्या अधिकारी व संबधीत कंत्राटदाराला सुरू आसलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आ. संदीप क्षीरसागर यांनी दिल्या. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार आहे. काम पूर्ण होईपर्यंत सर्वांनी पर्यायी रस्ता मार्गाचा वापर करून सहकार्य करावे असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
शहरातील डीपी रोडचे काम दर्जेदार होणार!
नागरिक,व्यापार्यांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा-आ.संदीप क्षीरसागर
