Site icon लोकाशा-बंब न्यूज

काळेंना मतदार हाबाडा देवून पेन्शनवर पाठवणार-प्रदीप सोळुंके


बीड, दि.27 (लोकाशा न्युज) ः विक्रम काळे स्वत: 14 वर्षे आमदार आहेत तर त्यांचे वडिल देखील सात वर्षे आमदार होते. घरात 21 वर्षे आमदारकी असूनही विक्रम काळे यांच्याकडून शिक्षक व संस्थाचालकांच्या प्रश्नांच्या सोडणवूकीसाठी हवे तसे प्रयत्न झाले नाहीत. पेन्शनचा विषय आहेत तसाच राहिला असल्याने शिक्षकांत प्रचंड नाराजी पसरली आहे. या निवडणूक मतदार विक्रम काळेंना हाबाडा देवून पेन्शनवर पाठविणार असल्याचे मत औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघातील उमेदवार प्रदीप सोळुंके यांनी बीडमध्ये शुक्रवारी दि.27 जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी राधेश्याम जाटकर, विनोद चव्हाण, राजेंद्र आमटे आदींची उपस्थिती होती. पत्रकार परिषदेत प्रदीप सोळुंके म्हणाले, विक्रम काळे यांच्याबद्दल नाराजी असून भाजप उमेदवाराचा संपर्क नाही. आपण 25 वर्षांपासून वक्ता, लेखक, किर्तनकार म्हणून मराठवाड्यातील सर्वच घटकांना परिचित आहोत. या निवडणुकीच्या निमित्ताने शैक्षणिक जागृतीला सुरुवात झाली आहे. राजकारण वाईट नाही, मात्र राजकारणात चांगल्या लोकांची गरज आहे. आपल्याला बंडखोर म्हटले जात असले तरी आपण गुलाम नाहीत म्हणूनच उमेदवारी दाखल केली. जुनी पेन्शन योजना, विना अनुदान धोरण यावर सर्वच घटकांचा भ्रमनिरास झाला आहे. शेतकर्‍यांनंतर विनाअनुदानित शिक्षकांच्याच आत्महत्या आहेत. आपण या घटकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणार आहे. या निवडणुकीत उभे असलेले राष्ट्रवादी व भाजपाचे दोन्ही उमेदवार मतदारांना पसंत नाहीत, मला मतदारांची पसंती असून माझी सुप्त लाट निर्माण झाली आहे. या लाटेत माझाच विजय होणार असल्याचा विश्‍वास देखील प्रदीप साळुंके यांनी व्यक्त केला.

Exit mobile version