Site icon लोकाशा-बंब न्यूज

अज्ञात वाहणाची धडक ,दुचाकीवरील
एक ठार तर एक जखमी

 कासारवाडीतील घटना ,गावावर शोककळा 

डाकू पिंप्रीत ही अपघात, चार विद्यार्थी गंभीर जखमी

सिरसाळा : रात्री अज्ञात वाहणाच्या धडकेत कासारवाडी/रामेवाडी ( ता.परळी) येथील एक जण ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना काल रात्री ११ च्या सुमारास घडल्याचे समजते आहे.
या अपघातात दुचाकी वरील सय्यद शेरखाॅ पठाण वय १७ रा.कासारवाडी ठार झाला आहे तर अकोल्या रामभाऊ इंगोले वय १३ रा. कासारवाडी हा गंभीर जखमी झाला आहे. इंगोले यास लातूर येथे उपचारार्थ पाठवले आहे. रात्री हा प्रकार कासारवाडी – पोहनेर रोड वर घडला आहे. यात मयत/जखमी यांच्या गाडीचा अज्ञात वाहनाशी अपघात झाला आहे. वाहन कोणी बघु शकले नाही. पंरतु हे वाहन अवैध वाहतूक करणारे हायवा किंवा ट्रॅक्टर असावे असा अंदाज गावातील नागरिक करु लागले आहेत . दरम्यान आज सकाळी प्रजासत्ताक दिना साजरा करण्यासाठी कानसुर ( ता.पाथरी)शाळेत जात असलेल्या डाकू पिंप्री ( ता.पाथरी) येथील विद्यार्थ्यांच्या ॲटोला समोरल वाहनाची धडक झाल्याने विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. योगेश घुगे, स्वप्नील चव्हाण, राहुल पिचे, संतणू सोनवणे असे त्या जखमी विद्यार्थ्यांचे नाव आहेत. सर्व विद्यार्थ्यी वर्ग ८/९ चे आहेत. त्यांना उपचारार्थ अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version