Site icon लोकाशा-बंब न्यूज

दहा लाखासाठी छळ, बळजबरीने गर्भपात, नगरच्या डॉक्टरसह पाच जणांवर गुन्हा दाखल


बीड, लग्नात मानपान दिला नाही, हुंडा कमी दिला, तू आम्हाला पसंत नाहीस, असे म्हणून एका विवाहितेचा छळ केला. त्यानंतर चार महिन्यांचा बळजबरीने गर्भपात केला ही घटना नगरमध्ये ऑगस्ट 2021 रोजी झाला, विवाहितेच्या फिर्यादीवरून छळसह विनासंमती गर्भपात केल्याने येथील शिवाजी नगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड माहेर असलेल्या 30 वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, 30 डिसेंबर 2018 रोजी तिचा विवाह नगर येथील आशिष आव्हाड रा. तवलेनगर औरंगाबाद रोड नगर याच्याशी झाला, सासरच्या मंडळींनी पाच महिने चांगले नांदवले, त्यानंतर मात्र तू पसंत नाहीस, असे म्हणून पतीने मारहाण सुरू केली, दरम्यानच्या काळात कोरोनामुळे विवाहितेचे वडील मयत झाले, त्यानंतर मुलगी नंदवायची असेल तर दहा लाखाची मागणी केली, 24 जानेवारीला पती आशिष, सासू, नंदा, सासरा भगिनाथ आव्हाड, मावस सासू सुरेखला सुधाकर ढाकणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान 1 अगस्त 2021 रोजी गर्भ खराब आहे असे सांगून नगरच्या बडे हॉस्पिटल मधे नेले व तेथे बळजबरीने फॉर्म वर स्वाक्षरी घेऊन गर्भ पात केल्याचे म्हंटले आहे, यावरून सदर डॉक्टर वर पण गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version