दिंद्रुड ( लोकाशा न्युज )
गणेश काटकर
ऊस तोडणी करून जीवन जगणारे सोन्नाखोटा येथील हजारे दांपत्ये सध्या सर्वत्र चर्चेत आहेत दोन दिवसापूर्वी फेसबुक वर त्यांच्या एक गाण्याचा व्हिडिओ तुफान वायरल झाला होता आणि या गाण्याची भुरळ न नेटकऱ्यांना पडली आहे. प्रत्येकाने आपापल्या फेसबुक स्टेटस ला व्हाट्सअप इंस्टाग्राम ला हा विडोओ शेअर केला आहे हा व्हिडिओ शेअर केल्याने हे हजारे कुटुंब एका रात्रीत महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहे त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
हे दांपत्य वडवणी तालुक्यातील सोनाखोटा येथील आहे हे कुटुंब अनेक दिवसापासून मोल मोजरी उसतोडी करून जगत आहे मनीषा या मूळच्या डोंगरे, दिलीप सुंदरराव डोंगरे यांना पाच मुली त्यांनी आपल्या मुलीचे लग्न मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या कुटुंबात लावून दिले त्यातील एक मुलगी म्हणजे मनीषा शिक्षण जेमतेम पाचवी पर्यंत झाले नंतर त्यांना शाळा सोडून द्यावी लागली या महिलेचा विवाह गावातील अशोक हजारे यांच्याबरोबर झाला लग्न झाल्यापासून मनीषा अशोक हजारे हे कुटुंब त्यांना एक गुंटा ही जमीन नसल्यामुळे उसतोडी व मोलमजुरी करून आपापली उपजीविका भागवतात त्यांना तीन अपत्य असून दोन मुले व एक मुलगी आहे हे कुटुंब 23 गेल्या वर्षापासून ऊस तोडीचे काम करून आपले पोट भरत आहेत सध्या हे कुटुंब मुला बाळासाहेब शिवशक्ती साखर कारखाना कर्नाटक येथे दोन बैलगाडी टायर व ऊस तोडणीचे काम करत आहे त्यांच्याकडे सुरुवातीला साधा मोबाईल होता नंतर त्यांना कसेबसे पैसे जमा करून एक अँड्रॉइड मोबाईल घेतला मोबाईल मधील instagram वरील व्हिडिओ बघून त्यांनी आपणही असे व्हिडिओ बनवावे आणि त्यांनी काय काम करत असताना हिंदी गाण्यावरील स्वतःचे व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली त्यांनी आत्तापर्यंत 431 स्वतःची वेगवेगळे व्हिडिओ बनवून इंस्टाग्राम वर शेअर केले त्यांच्या व्हिडिओला इन्स्टॉल ग्रामवर चांगला प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला सध्या त्यांचे 79 हजार फॉलोवर आहेत. त्यांच्या हा एका व्हिडिओने प्रेक्षकांवर भुरळ घातल्याचं दिसत आहे मनिषा हजारे एका व्हिडिओमुळे रातोरात महाराष्ट्रात सुपरस्टार बनले आहे.
चौकट
पैशाने मिळत नाही हा आनंद
काय आणि लोकांकडे भरपूर पैसा असूनही त्यांना आनंदात जीवन जगता येत नाही नेहमी कशाचे ना टेंन्शन असते उच्चशिक्षित कुटुंबात लग्न झालं की काही दिवसात घटस्फोटापर्यंतचे प्रकरण जाते हे आपण सगळेच पाहत आहोत मात्र या कुटुंबाला ना संपत्तीचा मोह ना पैशाचा मोह दररोज गुराढोरा सारखी काम करत आपले जीवन अगदी आनंदात हसत हसत जगायचे म्हणून म्हणतो की हा आनंद पैशाने विकत घेता येणार नाही त्याला मुळात परिस्थितीत आनंदात जीवन जगणे हेच खरे आहे
