Site icon लोकाशा-बंब न्यूज

खा.प्रितमताई मुंडे यांचा शिरूर तालुक्यात झंझावाती दौरा,एवढं प्रेम दिलत…तुमच्या प्रत्येक मागणीला पूर्ण करण्याची ताकद मिळो हा आशीर्वादही द्या, खा.प्रितमताईंचे भावोद्गार ; वाड्यावस्त्यांवर साधला जनतेशी संवाद

शिरूर । दि.२१ ।
शिरूर तालुक्यातील जनतेने मुंडे साहेबांना आणि त्यांच्या पश्चात आम्हाला एवढं भरभरून प्रेम दिल आहे की ज्याची उतराई काहीही केल्याने होणार नाही. परंतु तुमच्या प्रेमासोबत नेहमीच आमच्या पाठीशी असणारा आणि तुमच्या प्रत्येक मागणीला पूर्ण करण्याची ताकद देणारा आशीर्वाद ही आम्हाला द्या असे भावोद्गार खा.प्रितमताई मुंडे यांनी काढले. शिरूर तालुक्यातील तागडगाव येथे त्या बोलत होत्या.

तालुक्यातील खोपटी, मानूर, लोणी, वारणी, पाडळी, खालापूरी, तागडगाव, खांबालिंबा या गावांना भेटी देऊन खा.प्रितमताई मुंडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. मानूर येथे श्री.गणेशानंद स्वामी अर्बन संस्थेचे त्यांनी उदघाटन केले. तसेच वारणी येथे हळदीकुंकूवाच्या कार्यक्रमानिमित्त महिलांशी मुक्तसंवाद ही त्यांनी साधला. यावेळी शिरूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

वारणी येथे बोलताना खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या कि ‘स्वार्थासाठी कुणापुढेही हात पसरायचे नाही ही शिकवण आपल्याला मुंडे साहेबांनी दिली आहे, त्यांनी दिलेला हा स्वाभिमानाचा वसा तुमच्या आशीर्वादाच्या बळावर आम्ही चालवत आहोत. राजकीय जीवनात अनेक चढउताराचे प्रसंग येत असतात, या प्रसंगांचा सामना करण्याची शक्ती आम्हाला जनतेतुन मिळणाऱ्या प्रेमातून मिळत आहे. शिरूरच्या लोकांनी आम्हाला नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे, या प्रेमाची उतराई शक्य नसली तरी तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहू’ असा विश्वास यावेळी खा.प्रितमताई मुंडे यांनी उपस्थितांना दिला.

अन् खा.प्रितमताईंनी जागेवर सोडविल्या अनेकांच्या समस्या

नियोजित कार्यक्रमांसाठी जात असताना ठिकठिकाणी भेटणाऱ्या लोकांशी खा. प्रितमताई मुंडे यांनी संवाद साधला, यावेळी अनेकांनी त्यांना आलेल्या अडचणी प्रितमताईंसमोर मांडल्या. सतत कार्यमग्न असणाऱ्या खा.प्रितमताईंनी इथेही त्यांच्या तत्परतेचा परिचय देऊन तात्काळ संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे सर्वांसमक्ष त्या लोकांच्या समस्या सोडवण्याच्या सूचना केल्या. खा.प्रितमताई मुंडे यांच्या या कार्यशैलीकडे बघून अनेक प्रत्यक्षदर्शींनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला.

••••

Exit mobile version