सिरसाळा ( मिलिंद चोपडे) :
सिरसाळ्यातील डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते बीएसएनएल टाॅवर पर्यंतचे रस्ता चौपदरीकरणाच्या कामासाठी रस्ता हद्दीतील ५० फुटांपर्यंतची व्यावसायिक अतिक्रमणे तीन दिवसात हटवली जाणार होती.
तशी नोटीस देखील संबंधित अतिक्रमण धारकांना सहाय्यक अभियंता गित्ते यांनी काल दिनांक २० रोजी प्रत्यक्ष भेट देऊन बजावली होती. या मुळे व्यावसायिकात खळबळ उडाली होती. नोटीस नुसार मुदत खुपच कमी होती. व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध व्हावी यासाठी तीन दिवसा ऐवजी एक महिण्याचा कालावधी करण्यात आला असल्याची माहिती सहायक अभियंता श्रीमती गित्ते यांनी पत्रकारांना बोलतांना दिली आहे .
● पंरतु एक महिन्यानंतर अतिक्रमण हटवले जाणार
: व्यावसायिकांची तारांबळ होऊ नये, पर्यायी जागा व्यावसायिकांनी शोधावी या साठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ प्रशासने हा निर्णय घेतला आहे. रस्ता चौपदरीकरण काम (१५ मिटर)उद्या रविवार पासुनच सूरु होणार आहे . एक महिण्या नंतर अतिक्रमण मात्र हटवले जाणारच आहे असेही गित्ते यांनी म्हंटले आहे.