Site icon लोकाशा-बंब न्यूज

परळी कोर्टाने केले राज ठाकरे यांचे अटक वॉरंट रद्द


बीड  : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला असून परळी कोर्टाने  त्यांचे अटक वॉरंट रद्द केले आहे. राज ठाकरे यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी कोर्टात सुनावणी झाली होती. दोन सुनावणीवेळी राज ठाकरे कोर्टात गैरहजर होते. त्यामुळे कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. 

बुधवारी राज ठाकरे कोर्टात हजर राहिले. यावेळी राज यांच्या वकिलाने केलेल्या युक्तिवादानंतर अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे.
अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर राज ठाकरे बुधवारी परळी कोर्टात हजर राहिले होते. सकाळी आकरा वाजता राज ठाकरे कोर्टात हजर झाले.त्यांच्या वकिलाने जोरदार युक्तिवाद करत अटक वॉरंट रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर कोर्टाने हे अटक वॉरंट रद्द केले.यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी कोर्टाबाहेर एकच जल्लोष केला.

Exit mobile version