Site icon लोकाशा-बंब न्यूज

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा जयसिंह भैय्यांनी दिला राजीनामा, संघटना बळकट करण्यासाठी पाच वर्ष काम केले, याही पुढे पक्षासाठी सक्षमपणे काम करणार – सोळंके

,

बीड, दि. 14 (लोकाशा न्यूज) : जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती जयसिंह सोळंके यांनी 14 जानेवारी रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पाच वर्षाच्या काळात संघटना मजबूत आणि बळकट करण्याचे काम केले, याही पुढे पवार साहेबांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याबरोबरच पक्षासाठी सक्षमपणे काम करणार असल्याचे श्री. सोळंके यांनी म्हटले आहे. 

राष्ट्रवादी युवक काँग्रेस बीड जिल्हाध्यक्ष म्हणुन मी 2017 पासुन काम करत होतो. 2017 ते 2022 या काळात पदाला न्याय देण्याचे काम मी प्रामाणिकपणे केले. संपूर्ण 5 वर्षाच्या काळात, बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बांधणी केली. संघटना मजबुत व बळकट करण्यासाठी काम करत राहिलो. राष्ट्रवादी युवक काँग्रेस बीड जिल्हाध्यक्ष म्हणुन काम करण्याची संधी दिल्याबद्दल पक्ष श्रेष्टींचे आभार, यापुढील काळात मा.पवार साहेबांचे विचार जनसामान्य माणसांपर्यंत पोहचविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सक्षमपणे काम करेल, अशी पोस्ट जयसिंह भैय्या सोळंके यांनी सोशल मिडीयावर टाकली आहे, यासंदर्भात अधिकृत पत्रही त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्याकडे दिले आहे. 

Exit mobile version