Site icon लोकाशा-बंब न्यूज

शेतकरी अगोदरच अडचणीत ; मग त्यांचा विमा थांबवता कशाला ?,तातडीने विमा अदा करण्याची पंकजाताई मुंडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बीड ।दिनांक ११।
अतिवृष्टीमुळे जिल्हयातील शेतकरी अगोदरच अडचणीत असताना त्यात पुन्हा विमा मिळण्यासाठी त्यांना कंपन्यांकडून आडकाठी आणली जात आहे. शेतकरी अडचणीत असताना त्यांचा विमा थांबविण्याचे कारण काय? असा सवाल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तातडीने द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 पंकजाताई मुंडे यांनी यासंदर्भात एक ट्विट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे याकडे लक्ष वेधले आहे.

“बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम विमा कंपनीने थकवण्याचे कारण काय ?
नियमाने ऑनलाईन पीक विमा भरून देखील अतिवृष्टीच्या अडचणींचा सामना करत असताना शेतकऱ्यांचा विमा थांबवणे शंभर टक्के अयोग्य आहे.विमा कंपनीला मा. मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ आदेश देऊन शेतकऱ्यांची विम्याची रक्कम त्वरित अदा करण्यास सांगावे.” असं पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे.
••••

Exit mobile version