बीड, दि. 9 (लोकाशा न्यूज) : जिल्ह्याचे माजी खा. कै. रामराव आवरगावकर यांच्यामुळे आवरगावचे (ता.धारूर) नाव संपूर्ण महाराष्ट्रात पोहचलेले आहे. अगदी त्यांच्याप्रमाणेच सध्या या गावातील अनेक जण काम करत आहेत. याच गावचे भुमिपुत्र असलेले आबासाहेब जगताप यांनी आपल्या कर्तृत्वातून मराठवाड्यात एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. सर्वांना सोबत घेवून चालणार्या आबासाहेब जगताप यांच्या कामाची दखल घेवून देवळांना खु. (ता.खुलताबाद जि.औरंगाबाद) येथील शेतकरी सहकारी सोसायटीच्या संचालकपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे संपूर्ण मराठवाड्यातून अभिनंदन केले जात आहे.
ग्रामीण भागातून पुढे आलेले तरूण समाजात मोठे परिवर्तन घडवू शकतात, हे आवरगावमधील अनेकांनी आपल्या कर्तृत्वातून खर्या अर्थाने दाखवून दिलेले आहे. जिल्ह्याचे माजी खा. रामराव आवरगाव यांनी सर्वच क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करून आपल्या गावाचे नाव गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेले, अगदी त्यांच्याप्रमाणेच आज या गावातील अनेक जण बीड, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथे वास्तव्य करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. विशेष म्हणजे आबासाहेब जगताप हे मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान देत आहेत. ज्या ज्यावेळी गावातील गावकर्यांना अडचणी आल्या त्या त्यावेळी ते मदतीसाठी धावून आले आणि भविष्यातही ते येणारच आहेत. मराठवाड्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणार्या याच आबासाहेब जगताप यांची आता देवळांना खु. (ता.खुलताबाद जि.औरंगाबाद) येथील शेतकरी सहकारी सोसायटीच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे संपूर्ण मराठवाड्यातून अभिनंदन केले जात आहे.