परळी वैजनाथ दि १ (लोकाशा न्युज) :- परळी तालुक्यातील धर्मापुरी येथील डॉक्टराने २९ वर्षीय पत्नीशी अनैसर्गिक शारीरिक संबंध करीत अत्याचार केला तसेच मारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याची घटना घडली. उच्च शिक्षित डॉक्टराकडून या प्रकारे महिलेस वागणूक मिळाल्याची घटनेने शहरासह तालुक्यात चवीने चर्चा होत आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात डॉक्टर व त्यांचे ७ नातेवाईंकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे बी. एच. एम. एस शिक्षण घेतलेला इसम खाजगी प्रॅक्टिस करीत असून या व्यक्तीने नात्यातील २९ वर्षीय महिलेसोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवत, मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले. तसेच या महिलेचा शारीरिक व मानसिक छळ देखील केला. पीडित महिलेने त्रासाला कंटाळून परळी ग्रामीण पोलीस ठाणे गाठून आपली कैफियत व्यक्त केली असता परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरन ३१३ / २०२२ कलम ३७७, ४९८ अ, ३२३, ५०४, ३४ भादवीनुसार पीडित महिलेचा पती आकर्षण अशोक बनसोडे, सासू छाया अशोक बनसोडे, नणंद अश्विनी अशोक बनसोडे, दीर आवर्जण अशोक बनसोडे, नवऱ्याच्या आत्याची सून अर्चना विलास गंडले, यांची दोन मुले विशाखा आणि बंटी आदी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील आरोपी डॉक्टर व सर्वच्या सर्व ७ नातेवाईक आरोपी फरार झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि खोडेवाड हे करीत आहेत.