माजलगांव: लोकाशा न्युज
तालुक्यातील दिग्गजांच्या मानल्या जाणा-या ग्रामपंचायती पैकी एक असलेल्या सोन्नाथडी या गावावर मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक यांची पकड होती परंतु मागील काळात मुंबई बाजार समितीवर गेल्यानंतर अशोक डक यांची ढिली झालेली पकड आणि एकुणच राष्ट्रवादीकडुन कार्यकत्र्यांवर होत असलेल्या दुजाभावाची परिणिती म्हणुन आपलीच ग्रामपंचायत गमावण्याची नामुष्की अशोक डक यांच्यावर आल्याने बाकी सोडुन केवळ हीच चर्चा सध्या रंगात आली असुन डक यांच्या उमेदवाराच्या विरोधात असलेल्या वंदना केरबा तपसे यांनी बाजी मारली आहे.
तालुक्यात दिग्गज मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तसेच आ. प्रकाशदादा सोळंके यांचे राईट हॅंड तथा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी उभा केलेल्या पॅनलमधील सरपंच पदाच्या उमेदवाराचा दारून पराभव झाला आहे. ओबीसी प्रवर्गाला राखील असलेल्या सरपंच पदासाठी अशोक डक यांच्या उमेदवाराचा पराभव करुन भाजप गटाकडून उभा असलेल्या वंदना केरबा तपसे यांनी बाजी मारली आहे. होमग्राउंड असलेल्या सोन्नाथडीवर डक यांचे लक्ष कमी झाले आहे तसेच कार्यकर्ते देखील मोठया प्रमाणावर मागील आडीच वर्षांच्या राष्ट्रवादीच्या कामकाजावर संतापलेले असुन कुठल्याही कार्यकत्र्याला कामे मिळत नाहीत त्यामुळे अशोक डक यांना राजकीय धक्का देत गांवक-यांनी जमीनीवर आणले अशी चर्चा माजलगांव परिसरात आहे. नुकतेच माजलगाव मतदार संघातील धारुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान आ. प्रकाश सोळंके यांना जबरदस्त धक्का बसलेला असतानाच आता त्यांचे विस्वासू अशोक डक यांना देखील ग्रामस्थांनी घरचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे वर्चस्व तूर्तास कमी होतांना दिसून येत असुन गांवक-यांनी अशोक डक यांना हाबाडा देत सर्वसामान्य घरातुन आलेल्या वंदना केरबा तपसे यांना निवडुन देवून जनता आपली नाराजी मतदानाच्या माध्यमातुन व्यक्त करीत असल्याचे दिसुन येत आहे.