Site icon लोकाशा-बंब न्यूज

मुंडे भगिणींच्या नेतृत्वाखाली पहिली ग्रामपंचायत बिनविरोध, रेणापुरी ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात, रेणापुरीच्या सरपंचपदाची माळ विमल नाईकनवरे यांच्या गळ्यात पडणार

माजलगाव, दि. 6 लोकाशा न्युज :
ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असुन माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि
खा. प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली रेणापुरी ग्रामपंचायत बिनविरोध आली असुन मागील 45 वर्षांपासुनची परंपरा गावाने कायम ठेवली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरू आहे परंतु रेणापुरी या पुनर्वसित ग्रामस्थांनी मागील 45 वर्षांपासुन असलेल्या परंपरेचा इतिहास कायम ठेवत रेणापुरी ग्रामपंचायत बिनविरोध ठेवली आहे. माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि खा. प्रितमताई मुंडे
यांच्या नेतृत्वाखाली रेणापुरी ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आली आहे. बाजार समितीचे सभापती नितीन नाईकनवरे यांच्या निवासस्थांनी किशनराव नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वांनुमते ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचा निर्णय झाला. यावेळी ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी उमेदवारी अर्ज अथवा पॅनॉल न टाकण्याचा निर्धार करत रेणापुरी ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याची परंपरा कायम ठेवली. सरपंचपदासाठी केवळ सौ. विमल किशनराव नाईकनवरे यांचा अर्ज आल्यामुळे सरपंच पदाची माळ विमल नाईकनवरे यांच्या गळ्यात पडणार आहे तर ग्रामपंचायत सदस्यासाठी केवळ नितीन किशनराव नाईकनवरे, राम उध्दवराव चोरगे, सौ. रोहिणी भिवराज नाईकनवरे, सौ. अनुराधा अशोक नाईकनवरे, सौ. कोमल राजाभाउ पांचाळ, भीमा राजाराम घडसे, सौ. सीताबाई श्रीपती घडसींगे यांचे सात अर्ज आल्याने हे सातही सदस्य बिनविरोध निवडुण येण्याचा मार्ग आता मोकळा झाला असुन केवळ विजयी उमेदवार म्हणुन घोषित करण्याचे व शिक्कामोर्तब करण्याचे बाकी आहे.

Exit mobile version