बीड, दि.6:- जुन्या पिढीतील एक आदर्श व्यक्तिमत्व किसनरावजी चिमाजी जेजुरकर यांचे मध्यरात्री एक वाजून 36 मिनिटांनी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी बी. के.जेजुरकर यांचे ते वडील होते.
मनमिळाऊ स्वभावाचे तसेच प्रत्येक व्यक्तींच्या सुखदुःखात कायम सर्वात पुढे राहून आधार देण्याचे काम किसनराव जेजुरकर हे करत. गेल्या काही दिवसापासून वया मानाने ते थकले होते. दि.6 डिसेंबर रोजी मध्यरात्री 1.36 मिनिटाने पुणे येथे अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार दि.6/12/2022 रोजी ठीक 11.30 मिनिटाने अमरधाम, केडगाव अहमदनगर येथे होणार आहे.त्यांच्या दुःखात दैनिक लोकाशा परिवार सहभागी आहे.