बीड, दि. 5 (लोकाशा न्यूज) : मागील अनेक दिवसांपासून शिवाजीनगर ठाण्यात फक्त वसुलीचेच काम सुरु आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याची निष्क्रिय कार्यपद्धती माध्यमांनी वारंवार समोर आणलेली आहे. अखेर सोमवारी (दि.5) सायंकाळी आठच्या सुमारास दोन लाचखोरांचा चेहरा एसीबीने केलेल्या कारवाईने समोर आला आहे. एसीबीच्या या कारवाईने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
शिवाजीनगर पोलिसांची भ्रष्ट निती अखेर उघड, विनयभंगाचा गुन्हा बी फायनल करण्यासाठी पन्नास हजारांची लाच मागितली, लाचेचे दहा हजार घेताना एका एपीआयसह पोलिस कर्मचार्याला रंगेहाथ पकडले, औरंगाबाद एसीबीची बीडमध्ये कारवाई
