बीड, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण करत असताना आप्पाराव पवार यांचे निधन झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. जिल्हा प्रशासनाने अशा घटना घडता कामा नयेत याची गांभीर्याने काळजी घ्यावी.
मयत आप्पाराव पवार यांनी सुरू केलेला न्याय हक्कासाठीचा लढा व्यर्थ जाणार नाही याची लोकप्रतिनिधी म्हणून मी जवाबदारी घेते.पवार यांच्या कुटुंबाला देखील हा विश्वास मी दिला आहे, माझ्या विनंतीला मान देऊन रात्री पवार कुटुंबाने त्यांचे उपोषण मागे घेतले आहे.
जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात तात्काळ बैठक घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत.सदर जमीन देने शक्य नसेल तर प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी.अशा प्रकारे कुणालाही बेदखल करता येणार नाही याचे प्रशासनाने भान ठेवावे, असे खा प्रीतम ताई मुंडे यांनी म्हंटले आहे.