बीड, सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ग्रामपंचायतचे अर्ज भरण्यास सर्वांचं मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या, यावर दैनिक लोकाशाने आवाज उठवला होता, तर हीच अडचण जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी निवडणूक आयोगाच्या कानावर घातली होती, ग्रामपंचायतीचे अर्ज ऑफिलाईन स्वीकारावे अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली होती, अखेर निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास परवानगी दिली आहे, विशेष म्हणजे उद्या ५.३० वाजेपर्यंत उमेदवारांना आपला अर्ज दाखल करता येणार आहे,
दरम्यान जिल्हाधिकारी आणि दैनिक लोकाशाने यासंदर्भात केलेल्या प्रयत्नामुळे
जिल्ह्यातील शेकडो उमेदवारांना न्याय मिळाला आहे.
आता निवडणूक विभाग ग्राम पंचयतीसाठी ऑफलाईन उमेदवारी अर्ज स्विकारणार, आयोगाने दिली परवानगी, उमेदवारांना उद्या ५.३० वाजेपर्यंत दाखल करता येणार अर्ज, जिल्हाधिकारी आणि दैनिक लोकाशाने केलेल्या प्रयत्नामुळे
जिल्ह्यातील शेकडो उमेदवारांना न्याय मिळाला
