Site icon लोकाशा-बंब न्यूज

सिनेटच्या निवडणुकीत सुभाष राऊत यांनी मारली विजयाची हॅट्रिक

औरंगाबाद, दि.२८ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गटातील पाच राखील जागांचे निकाल मंगळवारी (दि.२८) दुपारी जाहीर झाले. या निवडणुकीत समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते ऍड सुभाष राऊत यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. तब्बल साडेसात हजार मतांनी त्यांनी विजय मिळविला असून त्यांना मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर गटातील अधिसभा निवडणुकीसाठी ५०.७५ टक्के मतदान झाले होते.. एकूण ३६ हजार २५४ मतदारांपैकी १८ हजार ४०० पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावला.
सुभाष राऊत सर्वाधिक मताधिक्याने विजयी

या निवडणूकीत प्रवर्ग निहाय विजयी झालेले उमेदवार, त्यांना मिळालेली मते व प्रतिस्पर्धी उमेदवा वरील आघाडी पुढीलप्रमाणे :- सुनील यादवराव मगरे (अनुसूचित जाती प्रवर्ग) – ८ हजार ९३६ मते- आघाडी ६ हजार ८७१,
सुनील पुंडलिकराव निकम (अनुसूचित जमाती प्रवर्ग) ८ हजार ५१ मते
आघाडी , ४ हजार ७२१,
, राऊत सुभाष किशनराव (इतर मागास प्रवर्ग) – ९ हजार ४३३ मते, आघाडी ७ हजार ४७९, पूनम कैलास पाटील (महिला प्रवर्ग) – ८ हजार २ मते
आघाडी ५ हजार ९४, तर दत्तात्रय सुंदरराव भांगे (भटके विमुक्त जाती-जमाती) प्रवर्ग – ७ हजार २२६ मते आघाडी ४ हजार ७३३ हे विजयी झाले. मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात आले. प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ.भगवान साखळे, निवडणुक समितीचे अयक्ष कॅप्टन डॉ.सुरेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमाणपत्र देण्यात आले. सुभाष राऊत हे २०११ च्या आधी सभा निवडणुकीपासून सातत्याने निवडून येत आहेत. प्रत्येक वेळी त्यांची विजयाची आघाडी वाढत आहे . महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांचे ते निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात .

Exit mobile version