Site icon लोकाशा-बंब न्यूज

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रलंबित प्रस्ताव मंजूर करण्यास सरकारने दिली मान्यता, खा. प्रितमताईंच्या पत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तत्काळ घेतली दखल, खा. मुंडेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

बीड, दी.२९ बीड जिल्ह्याच्या खा. प्रीतमताई मुंडे यांच्या पत्राची तत्काळ दखल घेऊन सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रलंबित प्रस्ताव मंजूर करण्यास मान्यता दिली आहे, याबद्दल खासदार प्रीतमताई मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

मागील काही महिन्यांमध्ये या योजनेतील प्रस्ताव प्रलंबित राहत असल्याची बाब निदर्शनास येताच मा.मुख्यमंत्र्यांना याबाबत खासदार मुंडे यांनी पत्राद्वारे विनंती केली होती. ही योजना शेतकरी,शेतमजूर आणि ऊसतोड कामगारांच्या अकस्मात निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक बळ देणारी असल्यामुळे मा.मुख्यमंत्री महोदयांनी याविषयाचे गांभीर्य ओळखून प्रलंबित प्रस्ताव मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच ०७ एप्रिल २०२२ ते २२ ऑगस्ट २०२२ याकाळास खंडित कालावधी घोषित करून सर्व प्राप्त दावे निकाली काढण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. या स्वागतार्ह निर्णयासाठी राज्य सरकारचे आभार मानते असे खासदार मुंडे यांनी म्हटले आहे.

Exit mobile version