Site icon लोकाशा-बंब न्यूज

धारूर बाजार समिती निवडणुकीच्या उमेदवारी छाननीमध्ये नऊ अर्ज नामंजूर, एक जागा बिनविरोध


प्रतिनिधी । धारूर
धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून १८ जागेसाठी ८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते . या अर्जावर मंगळवारी छाननी करण्यात आली . यामध्ये नऊ अर्ज नामंजूर झाले आहेत . तर ७२ अर्ज वैद्य झाले आहेत . सेवा सहकारी सोसायटीतून इतर मागासवर्गीय प्रगवर्गातुन दाखल झालेल्या ५ पैकी चार अर्ज नामंजूर झाल्याने विठ्ठल गोरे यांची उमेदवारी बिनविरोध निघाली आहे .
धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक अटीतटीची होत असून दाखल झालेल्या ८१ उमेदवारी अर्जावर मंगळवारी छाननी करण्यात आली . या छानणीमध्ये इच्छुक उमेदवारांनी तक्रार केली नसली तरी कागदपत्राच्या त्रुटीमुळे ९ उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत . यामध्ये सेवा संस्थेतून नरोटे गणेश सावळा यांचे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे अर्जुना नामंजूर करण्यात आला आहे . इतर मागास प्रवर्गातून जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे संतोष शिरसागर , पंडित साक्रूडकर , श्रीधर आडसुळे , विष्णू यादव या चार जणांचे उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत . ग्रामपंचायत मतदार संघातून सुधाकर मोरे, पौर्णिमा भोजने यांचे अनुसूचित जातीचे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांचे अर्ज नमंजूर झाले आहेत . दुर्बल घटकातून कौशल्य नांदे यांचा अर्ज ना मंजूर करण्यात आला आहे . व्यापारी मतदार संघातून सूचक व अनुमोदक दोनदा असल्यामुळे विष्णू दरेकर यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे . एकूण ८१ उमेदवारी अर्जा पैकी ७२ अर्ज वैद्य ठरले असून नऊ अर्ज नामंजूर झाले आहे . अर्ज ना मंजूर झाल्याने सायंकाळी ५ वाजता पुन्हा छाननी करण्यात आली होती . या मध्ये सेवा संस्थेच्या इतर मागास प्रवर्गातून पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले होते . यातील जात वैधता प्रमाणपत्र नसल्यामुळे चार जणांचे उमेदवारी अर्ज नाम मंजूर झाल्याने विठ्ठल गोरे यांची उमेदवारी बिनविरोध निघाली आहे . इतर मागास प्रवर्गातून २ उमेदवारी अर्ज नामंजूर झाल्याने भाजप गटाकडून उच्य न्यायालयात दाद मागण्यात आली होती . परंतु दाखल अपील फेटाळण्यात आले

Exit mobile version