Site icon लोकाशा-बंब न्यूज

अनुदानाचे 410 कोटी आले, धारूर, शिरूर, वडवणी आणि पाटोदा तालुक्याला मात्र ठेंगा, धारूरमधील फक्त 2305 शेतकर्‍यांना मिळणार मदत


बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : खरीप हंगामात झालेल्या नुकसानीसाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे 810 कोटी रूपयांची मागणी केली होती. त्यापैकी 410 कोटी रूपये मंगळवारी जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेली ही रक्कम जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी तालुक्याला वर्ग केली आहे. मात्र या 410 कोटी रूपयांमध्ये धारूर, शिरूर, वडवणी आणि पाटोदा या तालुक्यांना ठेंगा दाखविण्यात आला आहे. वडवणी, शिरूर, पाटोदा या तालुक्याला तर एकही रूपयांचे अनुदान मिळणार नाही. धारूर तालुक्यातील तर केवळ 2305 शेतकर्‍यांना अनुदानाची रक्कम मिळणार आहे. दरम्यान या मदतीतून चार तालुक्यांवर मोठा अन्याय झाला आहे, या चार तालुक्यातील तहसिल प्रशासनाने कसे पंचनामे केले हेच कळायला तयार नाही.

Exit mobile version