बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूका ताकतीने लढणार आहे. यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी तळागाळापर्यंत पोहचणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड राजेश्वर चव्हाण यांनी म्हटले.
शुक्रवारी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात अॅड. चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षाची ध्येय धोरणे आणि पक्षाकडून जनहिताच्या सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. तसेच येणार्या काळात कशा पध्दतीने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस काम करणार आहे, याचीही माहिती त्यांनी यावेळी बोलून दाखविली, सर्वात महत्वाचे म्हणजे आगामी काळ निवडणूकांचा आहे, त्यानुसार लागलेल्या 704 ग्रामपंचायतींच्या निवडणूकींबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणूका आम्ही ताकतीने लढणार आहोत, या निवडणूकीत आमच्याच पक्षाच्या उमेदवारांचा मताधिक्यांनी विजय होईल, असा विश्वासही यावेळी अॅड राजेश्वर चव्हाण यांनी बोलून दाखविला आहे. यावेळी महादेव धांडे, महादेव उबाळे, पाटोद्याचे जाधव, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा विद्या जाधव यांच्यासह इतर पदाधिकार्यांची उपस्थिती होती.