Site icon लोकाशा-बंब न्यूज

प्रशासकिय कामात इंजिनिअर सय्यद मुजाहिद लतीफ यांचा डंका, लोकनिर्माण राष्ट्रीय पुरस्काराने होणार गौरव


बीड, दि. 17 (लोकाशा न्यूज) : सामान्य माणसाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्यायाची शिकवण व व्यक्तीहितासह राष्ट्रहिताला प्राधान्य देत सक्षम माणूस घडविणारा संस्कार देणारे लोकप्रिय दै.सोमेश्वर साथी,परळी वैजनाथ जिल्हा बीड.येथून प्रकाशित होणार्‍या दै. सोमेश्वर साथीच्या वर्धापन दिनानिमित्त दि.20 नोव्हेंबर 2022 रोजी दै.सोमेश्वर साथी लोकनिर्माण राष्ट्रीय पुरस्कार- 2022 चे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार प्रशासकिय कामात डंका असणारे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर सय्यद मुजाहिद लतीफ यांना लोकनिर्माण राष्ट्रीय पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.

जिल्हा परिषदेच्या अंबाजोगाई येथील बांधकाम उपविभागात कार्यरत असलेले ज्युनिअर इंजिनिअर सय्यद मुजाहिद लतीफ यांचे काम अत्यंत उल्लेखनिय आहे. त्यांच्या या कामामुळे बीड जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या विकास कामांना गती मिळालेली आहे. आलेले प्रत्येक काम ते काही मिनीटातच मार्गी लावतात, त्यामुळे एक चांगला अधिकारी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेवून त्यांना लोकनिर्माण राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा दै.सौमेश्वर साथीचे संपादक बालासाहेब फड यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. वृतपत्राच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे हे एक अग्रगण्य दैनिक. समाजात विधायक कार्य करणार्‍या व्यक्तींना, संस्थांना सन्मानित करण्याच्या हेतूने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध उद्योजक अरुण मराठे, प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेते अनिल मोरे, श्री प्रताप भैय्या देशमुख मा. प्रथम महापोर परभणी, श्री मोहनरावजी आव्हाड साहेब मुख्य अभियंता औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ, मा.डॉ. वर्षा पुनवटकर शिक्षिविद साहित्यक वर्धा,या.सुरेश.अ.हिवराळे सहनिर्माते संविधान एक रास्ता, संगिता जामगे साहित्यिक व जेष्ठ समाजसेविका गंगाखेड, स्वागताध्यक्ष एकता चे संस्थापक अध्यक्ष अजमत खान,अरूण पडघम, अध्यक्ष निवड समिती संपादक बालासाहेब फड आदि मान्यवर उपस्थित असणार आहेत. सदरील सोहळा स्थळ,सिटी पॅलेस हॉटेल सभागृह परभणी येथे मान्यवरांचे, नारायण चाळ, स्टेशन रोड परभणी दि. 20 नोव्हेंबर 2022 रोजी वार रविवार रोजी 2:30 वाजता उपस्थितीत संपन्न होणार अस
Exit mobile version