Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड जिल्ह्यातील साडे तीन लाख शेतकर्‍यांसाठी 410 कोटी रूपये मंजूर


बीड, दि. 17 (लोकाशा न्यूज) : सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिण्यात बीड जिल्ह्यात मोठठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. यामध्ये जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. याअनुषंगानेच जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सरकारकडे 810 कोटी रूपयांची मागणी केली होती. यापैकी साडे तीन लाख शेतकर्‍यांसाठी 410 कोटी रूपये सरकारने मंजूर केले आहेत. गुरूवारी यासंदर्भात जीआर काढण्यात आला आहे.

Exit mobile version