Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेत बीड तालुक्याने मारली बाजी


बीड । प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचारी क्रिडा स्पर्धेत रोमहर्षक स्पर्धेत बीड तालुक्याच्या संघाने सर्वसाधरण विजेतेपद मिळविले. दोन दिवशीय क्रिडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे आदी मान्यवरांच्या उपस्थिती रविवारी (दि.13) रोजी दिमाखदार सोहळ्यात आणि खेळाडूंच्या उत्स्फर्त जल्लोषात संपन्न झाले.
याप्रसंगी बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी खेळाडूंनी खेळाडूवृत्तीने सर्व स्पर्धेत भाग घेवून क्रिडा नैपूण्य दाखविल्याबद्दल अभिनंदन केले. प्रतिवर्षी जिल्हा परिषदेच्या डिपॉझीट निधीतून स्पर्धा घेण्यात येतील असे त्यांनी जाहिर केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी वासुदेव सोळंके यांनी यावेळी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनाखाली सदर स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाल्या.
क्रिडा स्पर्धेत बीड तालुक्याने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. कबड्डी महिला-पुरुष संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. कबड्डी महिला संघ प्रथम बीड तालुका, द्वितीय परळी, कबड्डी पुरुष संघ बीड तालुका प्रथम तर द्वितीय क्रमांक गेवराई संघाने मिळविला. आष्टीच्या खो-खो महिला संघाने प्रथम तर बीड महिला संघाने द्वितीय पारितोषीक पटकाविले. खो-खो पुरुष संघाने प्रथम तर अंबाजोगाई संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. थ्रो बॉल स्पर्धेत आष्टी प्रथम तर गेवराई तालुक्याच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. कबड्डीच्या सर्व स्पर्धेत जनरल ट्रॉफी बीड तालुक्याला मिळाली आहे.
वैयक्तिक स्पर्धेत यशस्वी खेळाडू पुढील प्रमाणे आहेत. तसेच सांस्कृतीक वैयक्तीक गायन स्पर्धेत प्रथम विशाल चव्हाण (आष्टी, द्वितीय जयश्री खेडकर, समुह गीत- तुफानातील दिवे आष्टी, द्वितीय पोवाडा गणेश काळे (अंबाजोगाई), तबला वादन प्रथम हनुमान सरवदे, द्वितीय के. सी. चव्हाण, वैयक्तीक नृत्य प्रथम राजश्री नलावडे (बीड), द्वितीय गणेश तौर (अंबाजोगाई), समुह नृत्य प्रथम शेतकरी नृत्य (अंबाजोगाई), द्वितीय नवराई माझी लाडाची (बीड), एकपात्री प्रयोग प्रथम उद्धव बडे (गेवराई), द्वितीय पपीता चव्हाण (बीड),
बक्षीस वितरणानंतर विजयी स्पर्धकांनी एकच जल्लोष साजरा केला. दोन दिवशीय कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, चंद्रशेखर केकाण, डॉ. ज्ञानोबा मोकाटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे, शिक्षण अधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (मा.) नागनाथ शिंदे, कार्यकारी अभियंता डी. एम. राजपूत, सुनिल चांदवडकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी रमेश शिंदे, डॉ. विक्रम सारुक, कृषी जिल्हाधिकारी एस. एम. साळवे, डॉ. विजय देशमुख, डॉ. अमोल गित्ते, कोंडीराम निंबाळकर आदींच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा ना भुतो नो भविष्य झाल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप शिक्षणाधिकारी हिरालाल कराड, शिक्षण विस्तार अधिकारी तुकाराम पवार, गौतम चोपडे, जयलाल राजपूत, शिवलाल राठोड, अनंत खेडकर, संतोष गायकवाड, सुनिल नवले यांच्यासह वार रुमच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version