Site icon लोकाशा-बंब न्यूज

आरोग्य विभागाच्या उपसंचालकांचा दणका, बीडच्या हिवताप कार्यालयातील 69 बोगस हंगामी फवारणी कर्मचार्‍यांवर अखेर फौजदारी गुन्हे दाखल, बीड जिल्ह्यात पुन्हा उडाली खळबळ


पुणे : हिवताप कार्यक्रमात सन 2021 मध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांच्या पद भरतीच्या परीक्षेमध्ये पात्र झालेल्या एकूण 69 उमेदवारांचे प्रमाणपत्र चौकशीअंती जणांचे प्रमाणपत्र बोगस आढळल्यानंतर शासनाने उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ लातूर यांना गुन्हे दखल करण्यासाठी प्राधिकृत केले होते. त्या अनुषंगाने रविवारी (13 नोव्हेंबर) रोजी बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात एकूण 69 जणांवर विहित कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

या प्रकरणात संबंधितांनी शासनाची फसवणूक केल्यामुळे सदर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांचे प्रमाणपत्र रद्द केले आहे. त्यामुळे सदर प्रमाणपत्र कोणत्याही पदभरतीमध्ये व शासकीय कामकाजामध्ये वापरले जाणार नाही असे आदेश देण्यात आलेले आहेत. नोकरीसाठी चुकीची माहिती किंवा बोगस प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणूक केली तर याची गंभीर दखल घेतली जाईल व बेकायदेशीर बाबी निदर्शनास आल्यानंतर सक्त कारवाई करण्यात येईल तसेच कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. त्वरित गंभीर दखल घेऊन त्यावर नियमानुसार कठोर कार्यवाही केली जाईल तसेच या बनावट प्रमाणपत्र प्रकरणांमध्ये ज्या व्यक्तींचा सहभाग आहे त्या सर्व व्यक्तींवर कार्यवाही केली जाईल व कोणाचीही गय केली जाणार नाही असे आरोग्य विभागातर्फे स्पस्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.

Exit mobile version